Wednesday 24 June, 2009

क्रॉस चेक .............

माझी दहावीची परिक्षा नुकतीच सम्पलेली आणी सुट्टी सुरु झाली होती. आईने मला एक बँकेचा चेक लिहायला बसवले. चेक लिहुन झाला, मग आई म्हणाली, चेक ला डाव्या कोपरयात क्रॉस कर. मी चेक च्या डाव्या कोपरयात एक फुलीचे चिन्ह काढले आणि चेक आईकडे दीला. चेक बघितल्यावर आईने मला परत बोलवले आणी चेक क्रॉस कसा करयचा ते दाखवले. त्याचे महत्त्व पण समजावुन सांगीतले. आज मला हि गोष्ट आठवली कि खुप हसायला येते. चेक लिहीताना नेहेमी मी काढलेल्या त्या फुलीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.

No comments:

Post a Comment